पुस्तक | फायनान्स चातुर्य | लेखक | अनिल लांबा | सुश्रुत कुलकर्णी |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १८४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
प्रत्येकाच्या आयुष्यात पैश्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काही ना काही कारणाने आपले पैश्यांसोबत संबंध येत असतात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा पगार.. घरातील पैसे.. कर्ज.. अश्या काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. परंतू जर तुम्ही व्यवसाय चालवत असाल तर मात्र तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.. आवश्यक आहे. व्यवसायाला लागणारी रक्कम.. कर्मचारी वेतन.. कर्ज.. इसोप्स.. काय नि किती. त्यातून तुम्हाला नफा कमवायचा असतो. तो कमावला नाही तर तुमचा व्यवसायच डबघायीला येतो. आणि अश्या गोष्टी होऊ नयेत, आधीच आपण काळजी घेऊन अशा परिस्थिती आपण कशा टाळू शकतो यासाठी आपल्याला वेळेआधीच तयारी करायला हवी. आणि त्या तयारीची पाहिली पायरी म्हणजे समस्या समजून घेणे. आणि त्यासाठी हे अनुभवांच्या आधारे लिहिलं गेलेलं पुस्तक म्हणजे एक पर्वणीच आहे.
"अनिल लांबा" लिखित "फायनान्स चातुर्य" या पुस्तकातून अनेक बारकावे सामान्य वाचकांसमोर मांडण्यात आले आहेत. लेखकाने स्वतःचे पैश्याशी असणारे नाते, स्वतः शिकलेले बारकावे.. अनेक परिस्थितीजन्य उपाय या पुस्तकातून सांगीतले आहेत. अगदी आपल्या साध्या भाषेत.. सरळ शब्दात.. आणि आकर्षक उदाहरणांसोबत या पैशांचे वेगवेगळे पैलू समजावून सांगितले आहेत. पुस्तकाला सहा महत्वाच्या भागात विभागीत केले आहे. "फायनान्शिअल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक, इन्कम टॅक्स, अर्थशास्र व्यापकदृष्ट्या" असे काही महत्त्वाचे विषय हाताळले आहेत.
तुमच्या मनात असणारे अनेक प्रश्न हे पुस्तक वाचून सुटतील. सामान्य वाचकांसाठी देखील इन्कम टॅक्स.. स्टॉक्स.. देशाचे अर्थशास्त्र सोपे करून सांगण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला एकूणच स्वतःच्या पेशंट पासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत होणाऱ्या छोट्या छोट्या हालचाली.. घडामोडी.. समजू लागतील. सोबतच काही सल्ले.. काही अनुभवातून उमटलेल्या सिद्ध सूचना आहेत ज्या तुम्हाला आयुष्यात नक्कीच कामी येतील. या आधी तुम्ही पैशाबद्दल एकही पुस्तक वाचले नसेल, तरीही हे पुस्तक तुमचे सुरुवात असू शकते.. पहिले पुस्तक म्हणून देखील समजायला सोपे आहे. आणि तुमच्यासाठी.. व्यवसायासाठी गरजेच्या.. अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतील. यातील मला आवडलेलं एक वाक्य म्हणजे,
"तुम्ही आयुष्यात किती मोठं यश मिळवणार, हे तुमच्या आर्थक बुद्धिमतेवर अवलबून असतं."
हीच आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, प्रत्येक वाचकाच्या घरात हे पुस्तक असावं. पैसा हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे. अगदी साध्या शब्दात आपण अनेक क्लिष्ट संज्ञा समजून घेऊ शकतो. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही हे पुस्तक अनेकदा वाचायला हवं असं मला वाटत. तुम्ही हे पुस्तक वाचले असेल तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा!!