व. पु. काळे - लेखक परिचय व पुस्तके | Va. Pu. Kale - Authors Info & Books

Va Pu Kale

वसंत पुरुषोत्तम काळे 𓂃✍︎

वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच वपु.. हा मराठी साहित्याचा एक मोहक, सहजसोप्या भाषेत भावविश्वाचा गूढ उलगडणारा आवाज. २५ मार्च १९३२ रोजी जन्मलेला आणि २६ जून २००१ रोजी आयुष्याची गोष्ट पूर्ण करणारा हा कथाकार, कादंबरीकार आणि कथाकथनाचा जादूगार महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेला.

वास्तुविशारद म्हणून व्यावसायिक वाटचाल करत असतानाच, लेखन हा त्यांचा खरी ओढ होती. मानवी नात्यांचे धागेदोरे, प्रेम-विरहाची नाजूक वेदना, एकटेपणाचे खोल रंग, आणि मनाला भिडणारी संवादशैली.. हे सारे त्यांनी आपल्या लेखणीतून इतक्या प्रभावीपणे मांडले की, वाचक त्यांच्या प्रत्येक शब्दाशी नाते जोडू लागला. साठहून अधिक पुस्तकांमधून पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची, ठिकरी यांसारखी शीर्षकं मराठी साहित्याच्या पानांवर चिरंतन कोरली गेली.

केवळ लिखाणातच नव्हे, तर जिवंत कथाकथनाच्या मंचावरही त्यांनी जादू घडवली.. तब्बल १६०० हून अधिक कार्यक्रम सादर करून. ऑडिओ कॅसेट्सच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य घराघरात पोचवलं; वाचक नव्हे तर श्रोतेही त्यांचे झाले.

त्यांच्या प्रतिभेला अनेक सन्मानांनी गौरवलं.. महाराष्ट्र शासनाचा “उत्तम लेखक” पुरस्कार, पु. भा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार, आणि अमेरिकेतील साहित्य संमेलनात अध्यक्षपदाचा मान. पण वपुंसाठी कदाचित सर्वात मोठा पुरस्कार होता.. वाचकांच्या मनातील ती अढळ जागा, जी आजही तितकीच जिवंत आहे.

साहित्यसंपदा ...✎ᝰ.📓🗒 ˎˊ˗

# पुस्तक श्रेणी परिचय
1 संवादिनी कथासंग्रह 🌐 लिंक
2 वपु ८५ कथासंग्रह -
3 मोडेन पण वाकणार नाही कथासंग्रह -
4 नवरा म्हणावा आपला कथासंग्रह -
5 वपुर्वाई कथासंग्रह -
6 मी माणूस शोधतोय कथासंग्रह 🌐 लिंक
7 गुलमोहर कथासंग्रह -
8 चतुर्भुज कथासंग्रह -
9 वन फॉर द रोड कथासंग्रह -
10 गोष्ट हातातली होती कथासंग्रह -
11 मायाबाजार कथासंग्रह -
12 इंटिमेट कथासंग्रह -
13 वलय कथासंग्रह -
14 झोळपा कथासंग्रह -
15 बाई बायको कॅलेंडर कथासंग्रह -
16 हुंकार कथासंग्रह 🌐 लिंक
17 भुलभुलैय्या कथासंग्रह -
18 स्वर कथासंग्रह -
19 कर्मचारी कथासंग्रह -
20 दोस्त कथासंग्रह -
21 का रे भुललासी कथासंग्रह -
22 ऐक सखे कथासंग्रह -
23 तप्तपदी कथासंग्रह -
24 घर हरवलेली माणसं कथासंग्रह 🌐 लिंक
25 सखी कथासंग्रह -
26 काही खरं काही खोटं कथासंग्रह -
27 महोत्सव कथासंग्रह -
28 रंग मनाचे कथासंग्रह -
29 गोफ एकांकिका संग्रह -
30 दुनिया तुला विसरेल ललित 🌐 लिंक
31 पाणपोई ललित -
32 प्रेममयी ललित -
33 फॅन्टसी.. एक प्रेयसी ललित -
34 निमित्त ललित -
35 माझं माझ्यापाशी? ललित -
36 कथाकथनाची कथा ललित -
37 प्लेजर बॉक्स भाग १ ललित -
38 प्लेजर बॉक्स भाग २ ललित -
39 वपुर्झा ललित -
40 रंगपंचमी ललित -
41 ललितकलेच्या सहवासात ललित -
42 ठिकरी कादंबरी -
43 तु भ्रमत आहासी वाया कादंबरी -
44 ही वाट एकटीची कादंबरी -
45 पार्टनर कादंबरी 🌐 लिंक
46 सांगे वडिलांची कीर्ती व्यक्तिचित्र -
47 चिअर्स व्यक्तिचित्र -
48 माणसं व्यक्तिचित्र -
49 जपून टाक पाऊल व्यक्तिचित्र -
50 आपण सारे अर्जुन वैचारिक 🌐 लिंक
51 दहाव्या रंगेतून संदर्भ ग्रंथ -
Previous Post Next Post

Contact Form