गो. नी. दाण्डेकर - लेखक परिचय व पुस्तके | Go. Ni. Dandekar - Authors Info & Books

Go. Ni. Dandekar

गोपाल नीलकंठ दाण्डेकर 𓂃✍︎

गोपाल नीलकंठ दाण्डेकर म्हणजेच आपले गोनीदा, सह्याद्रीवर आणि गडकोटांवर मनापासून प्रेम करणारे लेखक. ८ जुलै १९१६ रोजी विदर्भातल्या परतवाडा येथे जन्मलेले आणि १ जून १९९८ रोजी पुण्यात निधन पावलेले गोनीदा कादंबरीकार, प्रवासवर्णनकार आणि अखंड भटकंती करणारे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते.

लहान वयातच घर सोडून ते भटकंतीला निघाले. स्वातंत्र्य चळवळ, संतांचा सहवास, गावोगावची माणसं आणि महाराष्ट्राचे किल्ले, हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष जगलं. म्हणूनच त्यांच्या लेखनात डोंगरदऱ्या, नद्या, देवळं आणि साधी, कणखर माणसं इतक्या जिवंतपणे भेटतात. गडकिल्ल्यांची भ्रमंती मराठी माणसाच्या मनात रुजवणाऱ्यांमध्ये गोनीदांचं नाव आघाडीवर आहे.

शितू, पवनाकाठचा धोंडी, माचीवरला बुधा, जैत रे जैत, मृण्मयी, कृष्णवेध अशा कादंबऱ्या आणि मोगरा फुलला, तुका आकाशाएवढा यांसारख्या संतचरित्रात्मक कादंबऱ्यांतून त्यांनी मराठी वाचकाला एक वेगळं जग दाखवलं. 'जैत रे जैत' आणि 'पवनाकाठचा धोंडी' यांवर मराठी चित्रपटही आले.

'स्मरणगाथा' या आत्मकथनात्मक पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पण गोनीदांचा खरा वारसा म्हणजे आजही त्यांची पुस्तकं हातात घेऊन किल्ले फिरणारे असंख्य वाचक आणि भटके.

साहित्यसंपदा ...✎ᝰ.📓🗒 ˎˊ˗

# पुस्तक श्रेणी परिचय खरेदी
1 पडघवली कादंबरी - -
2 शितू कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
3 पवनाकाठचा धोंडी कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
4 माचीवरला बुधा कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
5 जैत रे जैत कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
6 मृण्मयी कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
7 कृष्णवेध कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
8 दास डोंगरी राहतो कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
9 कुणा एकाची भ्रमणगाथा कादंबरी 🌐 लिंक 🛒 Amazon
10 मोगरा फुलला चरित्र 🌐 लिंक 🛒 Amazon
11 तुका आकाशाएवढा चरित्र 🌐 लिंक 🛒 Amazon
12 स्मरणगाथा चरित्र 🌐 लिंक 🛒 Amazon
13 उडोनि हंस चालला आणि पद्मा कथासंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
14 दुर्गभ्रमणगाथा प्रवासवर्णन - -
Previous Post Next Post

Contact Form