विंदा करंदीकर - लेखक परिचय व पुस्तके | Vinda Karandikar - Authors Info & Books

Vinda Karandikar

गोविंद विनायक करंदीकर 𓂃✍︎

गोविंद विनायक करंदीकर, म्हणजेच मराठी रसिकांचे लाडके विंदा. २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातल्या देवगड तालुक्यातील धालवली गावात त्यांचा जन्म झाला. कवी, ललित निबंधकार, समीक्षक, अनुवादक आणि इंग्रजीचे प्राध्यापक अशी त्यांची अनेक रूपं होती. तरीही मराठी मनात ते कायम कवी म्हणूनच राहिले. 'देणाऱ्याने देत जावे' या त्यांच्या ओळी आजही अनेकांच्या ओठी असतात.

१९४९ मध्ये आलेल्या 'स्वेदगंगा' पासून त्यांच्या कवितेचा प्रवास सुरू झाला. पुढे मृद्गंध, धृपद, जातक आणि विरूपिका या संग्रहांतून त्यांनी कष्टकऱ्यांचं जगणं, प्रेम, निसर्ग आणि माणसाच्या अस्तित्वाचे प्रश्न मांडले. जगातल्या विविध तत्त्वज्ञानांचा वेध कवितेतून घेणारा 'अष्टदर्शने' हा त्यांचा शेवटचा संग्रह. मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांच्यासोबत गावोगावी केलेल्या काव्यवाचनामुळे त्यांची कविता सामान्य रसिकांपर्यंत पोहोचली.

मुलांसाठी लिहिलेल्या 'राणीचा बाग', 'सशाचे कान' आणि 'परी ग परी' यांसारख्या बालकवितांनी अनेक पिढ्यांचं बालपण रंगवलं. 'स्पर्शाची पालवी' आणि 'आकाशाचा अर्थ' हे त्यांचे ललित निबंधसंग्रह, तर 'परंपरा आणि नवता' हा समीक्षाग्रंथ. ज्ञानेश्वरांच्या 'अमृतानुभव' चं आधुनिक मराठीत रूपांतर आणि शेक्सपिअरच्या 'किंग लिअर' चा 'राजा लिअर' हा अनुवादही त्यांनी केला.

२००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विंदांना मिळाला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा सन्मान मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक. १४ मार्च २०१० रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. आज त्यांच्या नावाने 'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार' दिला जातो, पण विंदांचा खरा वारसा म्हणजे त्यांची कविता वाचताना आपल्याला पडणारे प्रश्न.

साहित्यसंपदा ...✎ᝰ.📓🗒 ˎˊ˗

# पुस्तक श्रेणी परिचय खरेदी
1 स्वेदगंगा काव्यसंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
2 मृद्गंध काव्यसंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
3 धृपद काव्यसंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
4 जातक काव्यसंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
5 विरुपिका काव्यसंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
6 अष्टदर्शने काव्यसंग्रह 🌐 लिंक 🛒 Amazon
7 राणीचा बाग बालकविता - -
8 एकदा काय झाले बालकविता - -
9 सशाचे कान बालकविता - -
10 एटू लोकांचा देश बालकविता - -
11 परी ग परी बालकविता - -
12 अजबखाना बालकविता - -
13 सर्कसवाला बालकविता - -
14 पिशीमावशी आणि तिची भुतावळ बालकविता - -
15 अडम् तडम् बालकविता - -
16 टॉप बालकविता - -
17 सात एके सात बालकविता - -
18 बागुलबोवा बालकविता - -
19 स्पर्शाची पालवी ललित निबंध - -
20 आकाशाचा अर्थ ललित निबंध - -
21 परंपरा आणि नवता समीक्षा - -
Previous Post Next Post

Contact Form