एकदा वाचून तर पहा... भाग ७
"एकदा वाचून तर पहा!" या सदरात, आम्ही दुर्मुखलेली परंतू वाखाणण्याजोगी, वाचायलाच हवी.. अशी काही पुस्तकं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या विशेष दिवसानिमित्त, त्या खास क्षणांचे औचित्य साधून विशेष अशी पाच पुस्तकं आम्ही तुम्हाला सुचवू जी तुमच्या वाचनाची खोली वाढवतील.. जाणिवेचं वर्तुळ विस्तृत करतील.. व नवीन माहिती तुमच्या समोर आणतील.
प्रत्येक पुस्तक सुंदरच असतं, पण हि पुस्तकं विशेष सुंदर आहेत.. तेंव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि पुस्तकांची यादी पोहचवा; आणि आपल्या वाचन संस्कृतीच्या चळवळीचा एक भाग व्हा!
आजची पुस्तकं...
१. मोगरा फुलला - गो. नी. दाण्डेकर
२. अग्निपंख - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
३. गोष्ट पैशापाण्याची - प्रफुल्ल वानखेडे
४. द आंत्रप्रन्योर - शरद तांदळे
५. मुसाफिर - अच्युत गोडबोले
‘मोगरा फुलला’ हे पुस्तक एका अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कथेचं अत्यंत सुंदर चित्रण आहे. गोनीदांच्या लेखणीतून संत ज्ञानेश्वरीच्या गोड कथा उलगडत जातात. ही केवळ एक कादंबरी नाही, तर ती महाराष्ट्रातील संत परंपरेचा, विशेषतः माऊलींच्या आत्म्याचा गंध घेत असलेली एक सुंदर कथा आहे. गोनीदांचे शब्द, पात्रांची गोड समर्पणं आणि संप्रदायाच्या परंपरेच्या घटकांचा निराकार वावर, प्रत्येक वाचकाच्या हृदयात काहीतरी हलवून ठेवतात. या कादंबरीतून ज्ञानोबा, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांचा संपूर्ण जीवनप्रवासच साकार होतो. त्यांच्या संघर्षांची, साधनेची आणि समर्पणाची किमया समजावून सांगणारे व एकात्मतेचा बोध उलगडणारे हे पुस्तक आहे. एका साध्या पण अत्यंत प्रभावी व गोड भाषेने, हळूहळू मोगरा फुलू लागतो. जगोद्धाराचा प्रयत्न, समाजाच्या परिघामध्ये झालेला त्रास, या पुस्तकात जणू एकत्र करण्यात आले आहेत.
‘अग्निपंख’ एक प्रेरणादायी चरित्र आहे, जे एक सामान्य मुलगा कसा देशाचे राष्ट्रपती आणि वैज्ञानिक होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण हे पुस्तक आपल्यासमोर सादर करते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन हे एका संघर्षाची, ध्येयवेडी यशाची आणि समाजासाठी समर्पित होण्याची प्रेरणा आहे. एक अत्यंत साधा आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असलेला माणूस, जेव्हा देशाच्या प्रगतीच्या यशस्वी मार्गावर चालताना आपली कठोर मेहनत आणि निरंतर शिक्षणाचा महत्त्व इतक्या सध्या शब्दात मांडतो, तेव्हा ते तुमच्या मनावर अधिराज्य करतं. ‘अग्निपंख’ तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंख देईल. रामेश्वरमच्या एका साध्या गावातून निघालेल्या मुलाची स्वप्नं.. अथक परिश्रम.. याची कथा डॉ. कलाम यांनी आपल्या चरित्रातून मांडली आहे. हमखास तुम्हाला मुळापासून बदलवून टाकणारं, एक उत्तम पुस्तक.
‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक आर्थिक ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेचा, त्या संघर्षांतून मिळालेल्या शहाणपणाचा आणि खूप महत्त्वाच्या जीवनाच्या पायऱ्यांचा उलगडलेला खजिना आहे. प्रफुल्ल वानखेडे यांनी या पुस्तकात व्यवसाय, पैसे आणि त्या दरम्यान असलेल्या मानवी नात्यांची अत्यंत साध्या आणि समजून सांगणाऱ्या पद्धतीने मांडणी केली आहे. पैशासोबत असलेल्या मूल्यांची आणि त्यासाठीच्या सुसंस्कृत संघर्षांची एक सुंदर चर्चा पुस्तकात होते. कसा एक साधा, गरिब व्यक्ती आपल्या मेहनतीने व योग्य निर्णयाच्या जोरावर जीवनात धन कमवू शकतो.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनात एक शक्तिशाली.. आमूलाग्र बदल घडवून आणू शकते.
‘द आंत्रप्रन्योर’ हे पुस्तक एक अत्यंत प्रेरणादायक आणि शिक्षापद्धतींनी भरलेलं आहे, ज्यामुळे वाचकाला केवळ व्यवसायाची माहिती मिळत नाही, तर त्याच्यातल्या व्यवसायिक गुणवत्तांवर आणि ध्येयवादावरही प्रकाश पडतो. शरद तांदळे यांच्या लेखणीतून तुमच्यातल्या "उद्योजक" जागा होईल. लेखक स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या मार्गावर चालत असताना जो अनुभव घेतो, त्या अनुभवांची शिदोरी आणि विविध व्यवसायिक धोरणं, जीवनातील अडचणींना कशा पद्धतीने तोंड देता येईल, हे अत्यंत प्रगल्भतेने समजावून दिलं आहे. यशापेक्षा अपयशातून शिकणे महत्त्वाचं आहे, आणि पुस्तकाच्या माध्यमातून लेखक आपल्याला हेच समजावून देतो. हे पुस्तक फक्त व्यवसायशास्त्र नव्हे, तर जीवनासाठी एक महत्त्वाचं मार्गदर्शन ठरू शकतं.
‘मुसाफिर’ हे पुस्तक म्हणजे एका व्यक्तीच्या आत्मशोधाचा आणि संघर्षाची कथा आहे. आच्युत गोडबोले यांच्या लेखणीतून एक अत्यंत माणुसकीच्या विचारांवर आधारित उलगडलेला त्यांचा हा विशेष जीवनप्रवास आहे. एका अत्यंत साध्या, जिद्दी व शिक्षणासाठी काहीही करण्याची तयारी असणाऱ्या नायकाची हि कथा आहे. गोडबोले यांच्या जीवनाच्या संघर्षात शिकलेली धडे, त्याच्या मुलाच्या अपेक्षांचा समावेश आणि लहानशा गावाच्या जीवनात मिळालेल्या शिक्षणाची चर्चा, हे सर्व एकत्र करून आपल्याला एक प्रेरणा मिळते. यात कुठेच निराशा नाही.. उलट आलेल्या संकटांना.. अडचणींना.. देखील अत्यंत गोड आणि प्रगल्भ विचारांनी आपल्यासमोर मांडले आहे. तुमच्या जगण्याला आकार.. विचारांना वेगळी दिशा देण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे.